मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. या खेळीमुळे मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स समोर मोठे आव्हान ठेवले. यासोबतच सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ दाखवत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने सलग १३ सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम टेम्बा बवुमाच्या नावावर होता, ज्याने २०१९-२० मध्ये सलग १३ सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने एका वर्षात ही कामगिरी करत सर्वांना चकित केले आहे. त्याने आयपीएलच्या या हंगामातील प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
आता सूर्यकुमार यादवची नजर टेम्बा बवुमाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने बवुमाच्या विक्रमाची बरोबरी केली. पंजाब किंग्ज विरुद्धच्या पुढील सामन्यात २५ धावा केल्यास तो बवुमाचा विक्रम मोडू शकतो. सध्या त्याची जी फॉर्म आहे, ते पाहता तो नक्कीच हा विक्रम मोडेल असा विश्वास क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.