पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्याबद्दल तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळत आहे. तिने मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीदरम्यान रेकॉर्डिंग केल्याचा संशय आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या दिवशी ज्योतीने याspecial train च्या पहिल्या फेरीमध्ये प्रवास केला. त्याच वेळी, तिने संपूर्ण मार्गाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, ज्योतीने शिर्डीत पोहोचल्यानंतरही अनेक ठिकाणांचे व्हिडिओ आणि फोटो काढले. ही सर्व कृती पूर्वनियोजित होती का, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणा करत आहेत. तसेच, या घटनेमागे संवेदनशील माहिती गोळा करण्याचा उद्देश होता का, या दृष्टीनेही तपास सुरू आहे. ज्योती 2023 मध्ये चार वेळा मुंबईत आली होती, प्रत्येक वेळी तिने शहरातील वेगवेगळ्या भागांचे व्हिडिओ बनवले. तिच्याकडून तीन मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा (फोटो आणि व्हिडिओ) सापडला आहे. ज्योतीला 16 मे रोजी अटक करण्यात आली असून तिची कोठडी 4 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. एएनआय आणि इतर गुप्तचर संस्था तिची कसून चौकशी करत आहेत. ज्योती अटकेपूर्वी पहलगाममध्ये कोणाच्या संपर्कात होती, तिने कोणाशी बातचित केली, याबद्दल तपास सुरू आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर
पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्याबद्दल तपास यंत्रणांना धक्कादायक माहिती मिळत आहे.

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या फेरीतील युट्युबर ज्योती मल्होत्रा, हेरगिरीच्या संशयाने सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर