बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
'किंग' चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, अरशद वारसी आणि अभय वर्मा यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट आहे. सुरुवातीला हा चित्रपट 2026 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, पण आता निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन माहितीनुसार, 'किंग' आता 2026 मध्ये गांधी जयंतीच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडे असल्यामुळे चित्रपटाला अधिक फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'किंग' चित्रपटातील शाहरुखच्या काही ॲक्शन सीक्वेन्सचे शूटिंग यापूर्वीच झाले आहे. सेटवरील माहिती बाहेर येऊ नये म्हणून निर्मात्यांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर सिद्धार्थ आनंद हे निर्माते आहेत. शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या कंपनीच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे. हा चित्रपट शाहरुखसाठी खूप खास आहे आणि यामध्ये तो ग्रे शेडमध्ये दिसण्याची शक्यता आहे.