पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील ऑर्थोपेडिक्स विभागातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांसोबत झालेल्या रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, विभागप्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत कॉलेज प्रशासनाने अँटी रॅगिंग समितीची बैठक घेतली असून, रॅगिंग करणारे डॉक्टर दोषी ठरले आहेत.
डॉ. गिरीश बारटक्के यांना विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करत डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांना हे पद दिले आहे. तसेच, डॉ. बारटक्के यांना उपअधिष्ठाता पदावरूनही हुकून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तक्रारदार डॉक्टरांच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली असून, तीन निवासी डॉक्टरांना निलंबित केले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू असून, अँटी रॅगिंग समिती सात दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करणार आहे. बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, तक्रारीची शहानिशा पूर्ण केली जात आहे, आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी १५ ते २० डॉक्टरांची अँटी रॅगिंग समिती स्थापन केली आहे.