पिंपरी-चिंचवडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.वैष्णवीने आत्महत्येपूर्वी आपल्या एका मैत्रिणीला सासरच्या त्रासाबाबत सांगितले होते. तिची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे, ज्यात तिने आई-वडिलांचा विरोध पत्करून शशांकसोबत लग्न केल्याची खंत व्यक्त केली आहे. "लवकरच घटस्फोट घेणार आहे," असे तिने मैत्रिणीला सांगितले होते. मात्र, त्याआधीच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानुष छळाबद्दल बोलली आहे. कामवालीच्या प्रकरणावरून झालेल्या मारहाणीचा तिने उल्लेख केला आहे. "मला पिंकी ताई म्हणाली, 'मी तुझी सगळीकडे बदनामी करते, तू नवऱ्याशीही लॉयल नव्हती'," असे वैष्णवीने क्लिपमध्ये म्हटले आहे. तसेच, सासरचे लोक तिला वाईट बोलत असल्याचा आणि मारहाण करत असल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरी: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना अटक, ऑडिओ क्लिप उघड
पिंपरी-चिंचवडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली असून, ऑडिओ क्लिप उघड झाली आहे.

पिंपरी: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांना अटक, ऑडिओ क्लिप उघड