ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत चांगली पकड मिळवली आहे. आता कंपनीने मोटरसायकल विभागात प्रवेश केला असून, त्यांची रोडस्टर मोटरसायकल लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही मोटरसायकल सध्या पाहण्यासाठी उपलब्ध असून लवकरच टेस्ट राईड आणि डिलिव्हरी सुरु होणार आहेत.ज्या लोकांना स्कूटर आवडत नाही किंवा ज्यांना लांबच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक पर्याय हवा आहे, त्यांच्यासाठी ही बाईक एक चांगला पर्याय आहे. अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटरला पर्याय नसल्यामुळे नाईलाजाने स्कूटर घेत होते, पण आता रोडस्टरच्या येण्याने त्यांना अधिक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यातील फुगेवाडी येथील ओलाच्या एक्सपिरिअन्स सेंटरमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहे. लवकरच या बाईकची टेस्ट राईड सुरू होण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकांनी या बाईकसाठी बुकिंग केले आहे, त्यांना लवकरच डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. रोडस्टर दिसायला साधारण मोटरसायकलसारखीच आहे, पण तिची रचना वेगळी आहे. इंजिनच्या जागी बॅटरी आणि मोटर देण्यात आली आहे. सीटखाली चार्जर असून तो काढताही येतो. ही बाईक क्लचशिवाय आहे, त्यामुळे क्लच दाबायची सवय असणाऱ्यांना थोडं वेगळं वाटू शकतं. या बाईकमध्ये 4.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो 252 किलोमीटरची रेंज देतो.
ओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरच
ओला इलेक्ट्रिकची रोडस्टर मोटरसायकल लवकरच पुण्यात उपलब्ध होणार आहे. पहा कधी सुरु होणार टेस्ट राईड आणि डिलिव्हरी.

ओला इलेक्ट्रिकची रोडस्टर बाईक पुण्यात! टेस्ट राईड लवकरच