देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. NB.1.8.1 आणि LF.7 या कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे चिंता वाढली आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये हे नवीन व्हेरिएंट आढळून आले असून, दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. INSACOG च्या डेटानुसार, एप्रिल महिन्यात तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक रुग्ण आढळला, तर मे महिन्यात गुजरातमध्ये LF.7 चे चार रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या दोन्ही व्हेरिएंटला 'Variants Under Monitoring' च्या यादीत ठेवले आहे.सध्या भारतात JN.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आहेत, जे तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी 53 टक्के आहेत. BA.2 (26%) आणि इतर ओमायक्रॉन सबव्हेरिएंट्स (20%) यांचाही समावेश आहे. NB.1.8.1 च्या स्पाइक प्रोटीनमधील काही बदलांमुळे हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, WHO च्या अहवालानुसार, या व्हेरिएंटमुळे जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याला सध्या तरी कमी धोका आहे.देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यात ICMR, NCDC आणि इतर आरोग्य संस्थांमधील तज्ज्ञांनी परिस्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती नियंत्रणात असली तरी, सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. IDSP आणि ICMR चं सेंटिनेल सर्व्हेलन्स नेटवर्क श्वसनाच्या आजारांवर लक्ष ठेवून आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्क
देशात कोरोनाच्या NB.1.8.1 आणि LF.7 या दोन नवीन व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये रुग्ण आढळले असून, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

कोरोनाचा वाढता धोका: NB.1.8.1 आणि LF.7 व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आरोग्य विभाग सतर्क