महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पुण्याचे विठ्ठल भक्तांनी दोन टन फुलांची सजावट केली आहे. या सजावटीत विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे मंदिराचा गाभारा मनमोहक दिसत आहे. पुणे येथील चव्हाण परिवाराच्या वतीने ही सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी ब्लू डीजी गड्डी, कामिनी, जिप्सो, ऑर्किड, जरवेरा, गुलाब आणि झेंडू अशा विविध फुलांचा समावेश आहे.
सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त केल्या गेलेल्या या आकर्षक सजावटीमुळे भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंदिर समितीच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांच्या निमित्ताने मंदिर सजवले जाते. आजच्या दिवशी मंदिरातील फुलांची सजावट हजारो भाविकांना आकर्षित करत आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झालेली ही सुंदर सजावट भक्तांसाठी एक विशेष अनुभव ठरली आहे, आणि त्यासाठी मंदिर समितीचे आभार मानले जात आहेत.