बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर गावात 28 एप्रिल रोजी डॉक्टर अमोल पवार आणि मेडिकल चालक प्रवीण पवार यांच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डॉक्टर आणि मेडिकल चालक हे दवाखाना बंद करून घरी परत जात असताना, गावातील एका व्यक्तीने पेशंट तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवले. मेडिकल चालकाने काही वेळ थांबण्याची विनंती केली, ज्याचा राग मनात ठेवून आरोपींनी हल्ला केला. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.